महाराष्ट्र हे देशी व विदेशी गुंतवणूकदारांचे सर्वात पसंतीचे राज्य आहे . सर्वच राज्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे व सर्वात जास्त गुंतवणूक आपल्याचकडे झाल्याचे दावे करत असली तरी खरी स्थिती असोचेम या उद्योगांची शिखर संघटने च्या अहवालातून स्पष्ट होते. यात महाराष्ट्र सातत्याने आघाडीवर असतो .
याचे महत्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रात असलेली पायाभूत सुविधांची उपलब्धता यात प्रामुख्याने रस्ते,पाणी ,वीज व कुशल मनुष्यबळ यांचा समावेश होतो. याहून महत्वाचे म्हणजे राजकीय व सामाजिक स्थिरता . कारण कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदार त्याच्या पैश्यची व जीविताची हमी यांचा विचार करतो .
महाराष्ट्रात विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे पसरलेले आहे त्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होते . याच बरोबर कायदा व सुव्यवस्था राखणे ,सूट-सुटीत कर प्रणाली या मुळेही उद्योजक इकडे आकर्षित होतात .
खरे तर महाराष्ट्राचा आकार हा एख्याद्या युरोपीय राष्ट्रा एवढा आहे. तेव्हा आता राज्याने GDP ,Per -Capita -Income , व उत्पादन यांची त्यादृष्टीने 'लक्षे ' ठेवायला हवीत