सध्या भारतात FACEBOOK च्या ' FREE BASICS ' ची जोरदार चर्चा आहे यातून भारतात फ्री इंटरनेट ची मुहूर्तमेढ जाईल असा FACEBOOK चा दावा आहे तर टीकाकार 'येणाऱ्या काळात कोणताही स्पर्धक तयार होऊ नये यासाठी FACEBOOK ने केलेली तरतुद आहे' अशी टिपण्णी करत आहेत .
खरे तर असा प्रयत्न याआधी ही FACEBOOK ने ,'ZERO RENTAL ' च्या नावाखाली केला होता , यात FACEBOOK ,WHATSAPP ,इत्यादी WEBSITES चा कितीही वापर केला तरी कोणतेही शुल्क आकारले जाणार नव्हते .अगदी मोफत !!! पण खरी गोम तर इथेच आहे. म्हणजे कंपनी सांगेल तीच WEBSITE बघायची इतर WEBSITES चा वापर करायचा तर जास्त शुल्क लागेल .
इंटरनेट हे एक मुक्त व प्रभावी जाळे आहे , याला देश,धर्म,शिक्षण असे कोणतेही बंधन नाही . कोणताही व्यक्ती आपले विचार ,कल्पना इथे मांडू शकतो , एखादा व्यावसायिक अधिकाअधिक लोकां पर्यंत याच माद्यमातून पोहचू शकतो . FACEBOOK हि इंटरनेट च्या याच वैशित्यांचा वापर करून विश्वव्यापी बनले . आता मात्र त्याला सीमित करू पाहत आहे .
No comments:
Post a Comment