भारतीय समाज हा विविध धर्म व जात समूहांनी बनलेला आहे . भारतीय राज्य घटनेने विविध धार्मिक व भाषिक अल्प संख्यकां च्या व एकूण च प्रत्येक भारतीयाच्या हक्कांची कोणत्याही प्रकारचा भेद भाव होऊन पायमल्ली होणार नाही अशी काळजी घेतली आहे. सर्व नागरिकांना समान दर्जा दिला असून प्रत्येकाला विचार व धर्म स्वातंत्र्य दिले आहे. तरीही भारतात धार्मिक हिंसाचाराच्या घटना घडतच असतात, याकडे "त्या " केवळ राजकीय फायद्या साठी घडवल्या जातात असे म्हणून आपण दुर्लक्ष्य नाही करू शकत. धर्माच्या नावाखाली जरी या घडवून आणल्या जात असल्या तरी एक गोष्ट लक्ष्यात घेतली पाहिजे ती म्हणजे धार्मिक दंगली प्रामुख्याने निम-शहरी व मोठ्या शहरातील गरीब वस्तांमध्ये , कि ज्या अनेक दशन्कांपुर्वी वसलेल्या आहेत , कि जेथील लोक पिढ्यान-पिढ्या सोबत राहत आहेत असे लोक एक-मेकांच्या जीवा वर उठतात हे कशाचे द्योतक आहे?? एक लोकशाही देश म्हणून लोकशिक्षण करण्यात आपण कमी पडतोय कि इतिहासातील घटनांचा राग आज सुद्धा लोकां मध्ये आहे?? तसे जर असेल तर लोकशिक्षणा बरोबर हि जबाबदारी लेखक विचारवंतांबरोबर राजकार्ण्यांवर सुद्धा येते ,कारण जर तात्कालिक परिस्थिती व त्याचा सध्याच्या परिस्थितीशी नसलेली सुसंगतता लोकांना पटवून द्यावी लागेल . सुसंवादाची गरज …!!
No comments:
Post a Comment