Wednesday, 6 January 2016

CO-OPERATION MOVEMENT... SOLUTION FOR SUICIDES IN VIDHARBHA.

आज विदर्भातील आत्महत्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरुन टाकले आहे, खरे तर येथील माती साधन संपत्तीने समृद्ध आहे ,येथील काळ्या सुपीक मातीत  कापसाचे  व  संत्राचे चांगले पीक निघते ,पावसाचे प्रमाण सुद्धा समाधानकारक आहे , देशातील महत्व्याच्या शहर व् इतर भागांशी विदर्भ well connected  आहे. तरीही येथील शेतकरी आत्महत्या करत आहे याचे कारण  म्हणजे शेतीवर आधारित उद्योगधंदे व नेतृत्वाचा अभाव। 

पश्चिम महाराष्ट्राचे उदाहरण घेतल्यास लक्षात येते की सहकराने येथे कायापालट केला आहे ,दूध उद्योग ,साखर उद्योग ,सूत  गिरण्या यातून शेतकऱ्यांना योग्य 'मोल' व इतरांना  रोजगार मिळाला आहे.  हे  सुद्धा बरचसा भाग दुष्काळी  असतांना .!!

विदर्भाचा विकास व्ह्यायचा  तर सहकाराशिवाय तरणोपाय नाही , दूध ,कापूस व संत्रा आधारित उद्योग धंद्यांना येथे मोठी  संधी आहे.स्वातंत्र्योत्तर काळात बराच काल व सध्या ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद विदर्भाकडे आहे.यातून विकासाची संधी साधली जावी हीच अपेक्षा ..!! 

No comments:

Post a Comment