Wednesday, 6 January 2016

परकीय गुंतवणूक व महाराष्ट्र.

महाराष्ट्र हे देशी व विदेशी गुंतवणूकदारांचे सर्वात पसंतीचे राज्य  आहे . सर्वच राज्ये गुंतवणूकदारांना  आकर्षित  करण्याचे व सर्वात जास्त गुंतवणूक आपल्याचकडे झाल्याचे दावे करत असली तरी खरी स्थिती असोचेम या उद्योगांची शिखर संघटने च्या अहवालातून स्पष्ट होते. यात महाराष्ट्र सातत्याने  आघाडीवर असतो . 
याचे महत्वाचे  कारण म्हणजे महाराष्ट्रात असलेली पायाभूत  सुविधांची उपलब्धता यात प्रामुख्याने रस्ते,पाणी ,वीज व कुशल मनुष्यबळ यांचा समावेश होतो. याहून महत्वाचे म्हणजे  राजकीय व सामाजिक स्थिरता . कारण  कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी  गुंतवणूकदार त्याच्या पैश्यची व जीविताची हमी यांचा विचार करतो . 

 महाराष्ट्रात विविध शैक्षणिक संस्थांचे जाळे  पसरलेले आहे  त्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होते . याच बरोबर कायदा व सुव्यवस्था राखणे ,सूट-सुटीत कर प्रणाली या मुळेही उद्योजक इकडे आकर्षित होतात . 

 खरे तर महाराष्ट्राचा आकार हा एख्याद्या युरोपीय राष्ट्रा एवढा आहे. तेव्हा आता राज्याने GDP ,Per  -Capita -Income , व उत्पादन यांची त्यादृष्टीने 'लक्षे ' ठेवायला हवीत 

CO-OPERATION MOVEMENT... SOLUTION FOR SUICIDES IN VIDHARBHA.

आज विदर्भातील आत्महत्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरुन टाकले आहे, खरे तर येथील माती साधन संपत्तीने समृद्ध आहे ,येथील काळ्या सुपीक मातीत  कापसाचे  व  संत्राचे चांगले पीक निघते ,पावसाचे प्रमाण सुद्धा समाधानकारक आहे , देशातील महत्व्याच्या शहर व् इतर भागांशी विदर्भ well connected  आहे. तरीही येथील शेतकरी आत्महत्या करत आहे याचे कारण  म्हणजे शेतीवर आधारित उद्योगधंदे व नेतृत्वाचा अभाव। 

पश्चिम महाराष्ट्राचे उदाहरण घेतल्यास लक्षात येते की सहकराने येथे कायापालट केला आहे ,दूध उद्योग ,साखर उद्योग ,सूत  गिरण्या यातून शेतकऱ्यांना योग्य 'मोल' व इतरांना  रोजगार मिळाला आहे.  हे  सुद्धा बरचसा भाग दुष्काळी  असतांना .!!

विदर्भाचा विकास व्ह्यायचा  तर सहकाराशिवाय तरणोपाय नाही , दूध ,कापूस व संत्रा आधारित उद्योग धंद्यांना येथे मोठी  संधी आहे.स्वातंत्र्योत्तर काळात बराच काल व सध्या ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद विदर्भाकडे आहे.यातून विकासाची संधी साधली जावी हीच अपेक्षा ..!! 

FUTURE OF FREE BASICS..!!

सध्या  भारतात FACEBOOK  च्या ' FREE BASICS ' ची जोरदार चर्चा आहे  यातून भारतात फ्री इंटरनेट ची मुहूर्तमेढ  जाईल असा FACEBOOK चा दावा आहे तर टीकाकार 'येणाऱ्या काळात कोणताही स्पर्धक तयार  होऊ नये यासाठी FACEBOOK ने केलेली तरतुद  आहे' अशी टिपण्णी करत आहेत . 

खरे तर असा प्रयत्न याआधी ही FACEBOOK ने ,'ZERO RENTAL ' च्या नावाखाली केला होता , यात FACEBOOK ,WHATSAPP ,इत्यादी  WEBSITES चा कितीही वापर केला तरी कोणतेही शुल्क आकारले जाणार नव्हते .अगदी मोफत !!! पण  खरी गोम तर इथेच  आहे. म्हणजे कंपनी सांगेल तीच WEBSITE बघायची इतर WEBSITES चा वापर करायचा  तर   जास्त शुल्क लागेल . 

इंटरनेट हे एक मुक्त व प्रभावी जाळे  आहे , याला देश,धर्म,शिक्षण असे कोणतेही  बंधन नाही . कोणताही व्यक्ती आपले विचार ,कल्पना इथे मांडू शकतो , एखादा व्यावसायिक अधिकाअधिक लोकां पर्यंत  याच  माद्यमातून पोहचू शकतो . FACEBOOK हि इंटरनेट च्या याच  वैशित्यांचा वापर करून विश्वव्यापी बनले . आता मात्र त्याला सीमित करू पाहत  आहे .